पत्र माझ्या छोट्या सोनपरीला🖋️

आज मी तुला ना उपदेश नाही देणार आहे,एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे.
छोटीशी परी होती;अशीच न कळत माझ्या आयुष्यात आली होती.आई जाण्याचं दुःख पचवणं मला कठीण झालं होत,ती आल्यानंतर दुःख कमी नाही झालं पण कुठे तरी तिच्या सोबत हसून खेळून मन शांत होऊ लागलं होतं. मी कधी या वर विश्वास नव्हता ठेवला पूर्व जन्म वगैरे या संकल्पनांवर पण सारखं वाटायचं की काही तरी आमचा संबंध नक्की आहे पूर्व जन्माचा.
दोनच वर्षांची ओळख आहे पण आता आयुष्यभरासाठी ची सोबत कधी बनून गेली, माझ्यासाठी ती आणि तिच्यासाठी मी कधी बनून गेले समजलच नाही.तिला पण आणि मलापण.
नेहमी तिला हसताना पाहून आज मी माझा सारा थकवा घालवते.जास्त नाही जमत पण थोडं तरी आई बाबा नसल्याचं दुःख मी विसरून जाते.पण एक दिवस एवढ्या लवकर तिला ही या वेदनेतून जावं लागेल हे वाटलं नव्हतं.त्या छोट्या परीची मोठी परी.माझ्या हाती सोपवून तिला कायमची निघुन जाईल वाटलं नव्हतं.आज त्या छोटुल्या परीला मला सावरताना शब्द नाही मिळत आहेत.
तिचं सारं दुःख मला दूर करायचं आहे,पण सुरुवात कुठून करू काहीच नाही कळत आहे. आणि ती माझी परी कोण आहे माहीत आहे….तू….
मला माहित आहे किती झाले तरी मी तुझी आई होऊ नाही शकत,कारण आई आई असते. मी ही खुप रडते तिची आठवण आली की,पण कसं सांगू तुला तुझ्यासोबत दंगा घालून विसरून जाते.
माझी आई नेहमी मला सांगायची की सोबत नसले तरी जवळ राहील,कोणी जरी मायेने हात डोक्यावर फिरवला तर मी आहे समज.कोणाला दुखवू नको,मी समजून भांडू नको कारण मी लांब असेल दिसत नसले तरी तुझ्या मनात असेल….
हे मन खूप वाईट असतं स्वप्न आणि सत्य हे कधी समजून घेऊ देत नाही.आयुष्यात सगळेच सोडून जाण्यासाठी येतात,काही थोड्या वेळा करता तर काही कायमचे निघून जातात..मी खरं सांगू का???अजून खूप पावसाळे आपल्याला बघायचे आहेत…काही आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत तर काही एकटेच भिजून काढायचे आहेत,तुटलेली आयुष्याची घडी पुन्हा आपल्यालाच नीट करायची आहे…सॉरी सॉरी एकटी कधी नसशील काल आई होती, आज मी आहे उद्या दुसरं कोणी असेल…फरक फक्त एवढाच की आई ही आई आणि मी ही मी असेल…कोणाची तुलना कोणाशी करू नको…जे जे भेटले त्यांचं प्रेम गोळा कर आणि चेहऱ्यावरचा आनंद सर्वांना वाटत जा…तर तू जिंकली…
बाकी 10वी चा अभ्यास कर चांगले मार्कस मिळव ,मी नाही सांगणार बुवा तुला कारण माझी प्रिन्सेस खूप जास्त हुशार आहे आणि ती छान च मार्कस मिळवणार आहे.मला माझी ही गोड परी आयुष्याच्या परीक्षेत अव्वल नंबर नी पास झालेली पहायची आहे…आणि त्या करता लागणारी सगळी मदत मी करणार आहे….
त्यामुळे तयारी ला लाग या तात्पुरत्या 10वी च्या परिक्षे ला…कारण आयुष्याच्या परीक्षेला आपण दाखवून द्यायचं आहे की …तू किती ही कठीण पेपर काढला तरी मी तयार आहे टॉप करायला आणि पास व्हायला..Lots of love bachha…get well soon and stay positive…😘😘

Published by Amusing Soul.

Well written article is as like as Wrist Watch of my Dad, that's hookup you wear it again and again...💕 I am content writer and will help you to express your business in the market with unique ideas.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website with WordPress.com
Get started
%d bloggers like this: