आज कोरोना महामारीच्या काळात माणसाला कळून चुकलं आहे की आरोग्य हीच खरी मानवाची संपती आहे.आरोग्य ठीक तर सगळं काही ठीक.आज १००वर्षे वय असणारे वयोवृध्द कोरोनावर मात करताना दिसत आहेत तोच एकीकडे तरुणवर्ग कमजोर शक्तीमुळे आपले प्राण गमवत आहे.कधी विचार केला आहे का असे का घडत आहे? कारण पूर्वीचे लोक शेतात राबत आणि त्यामुळे त्यांचे आरोग्य नेहमी चांगले राहायचे आणि आज या कोरोनाच्या लढाई मध्ये वृध्द कोरोना ला हरवण्यात यशस्वी ठरत आहेत.याउलट पाहायला गेलो तर आपण आजची मंडळी AC मध्ये काम करून लठ्ठ होत आहोत,दमा,डायबेटिस,दमा यासारख्या आजारांना बळी पडलो आहोत. इंग्रजी मध्ये एक म्हण आहे की,”HEALTH IS WEALTH”
आणि ती कुठे तरी खरीच आहे.आपल्याकडे संपती कमी असली तरी चालेल पण आरोग्य चांगलं असणं हे नेहमीच आवश्यक आहे.
आपण आयुष्यात संपत्ती नाही कमवू शकलो तरी खेद नाही पण चांगले आरोग्य नसेल तर सारं काही निरर्थक आहे. विचार करायला गेले तर निरोगी व्यक्ती ही जीवनात नेहमी आनंदी आणि सुखी राहते पण तुम्ही निरोगी नसाल तर कोणत्याच गोष्टीचा आनंद मिळवणं सोपं राहत नाही.
निरोगी माणूस हा नेहमीच राष्ट्राची खरी संपत्ती असतो आणि देशाच्या प्रगती करता तो मोलाचा वाटा उचलतो.आज विचार केला तर जगात सर्वात जास्त टीबी चे रुग्ण हे भारतात आहेत यामागची कारणं पण काहीशी तशीच आहेत;उदाहरणार्थ तरुणांमध्ये वाढत असणार व्यसन प्रमाण.तसेच वाढणार एड्स च प्रमाण हे आजच्या तरुणाई ला नष्ट करू पाहत आहे. वाढणारं शहरातलं प्रदूषण,वृक्षतोड यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.
यामुळे चांगले आरोग्य मिळवायचे असेल तर एकच मूलमंत्र नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे,नियमित व्यायाम,सकाळी अथवा सायंकाळी फिरायला जाणे.योगासने हा देखील आपले आरोग्य चांगले ठेवण्याकरता एक सर्वोत्तम पर्याय आहे.कारण ती आपल्या प्राचीन संस्कृतीची देणगी आहे.नियमित योगासने केल्यामुळे आपणास चांगले आरोग्य तर मिळतेच पण मन ही आनंदी राहते.हल्ली योगासनाचे महत्व लक्षात घेता देशात बऱ्याच ठिकाणी योगसाधना शिकवणारी केंद्रे उभी केली जात आहेत आणि लोकही उस्फूर्तपणे यात सहभागी होत आहेत.
अशा रीतीने सुदृढ शरीर हे सुखी आयुष्याची गुरुकिल्ली आहे.त्यामुळे लोकहो व्यायाम करा आणि निरोगी रहा..
