चर्चा तर होणारच…!

मी खरंच कधीच कोणत्या पक्षाच्या विरोधात नव्हते कारण मला वाटायचं की संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि जनता ही स्वतः च्या अधिकाराचा वापर करून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करून निवडून देते.
असं म्हटलं जातं की ” A stich in time saves nine. ” वेळीच घातलेला एक टाका हा होणाऱ्या संभाव्य हानी पासून नेहमीच रक्षण करतो.या आधी पण मी खूप वेळा ऐकलं होतं पण आज पुन्हा मी जेव्हा सुनील स्वामी सरांचे संविधाना वरील विचार ऐकले आणि एक विचारांची लाट डोक्यात सतत मनातल्या किनाऱ्यावर आपटायला लागली.माझे बाबा नेहमी सांगायचे की “मतदान करताना नेहमी विचार करून कर;बाकीचे म्हणाले,पैसे मिळाले जेवण मिळालं म्हणून स्वतः ला कधीच विकून येऊ नको.तू मतदान करून कोणावर ही उपकार करत नाहीस तर तू माणूस म्हणून या देशाचं काही तरी देणं लागते.
पिढ्यानपिढ्या भोगलेल्या यातना,त्रास संपवण्यासाठी निर्माण केलेल्या संविधानाच्या मदतीने जो अधिकार मिळाला आहे त्याचा विचारपूर्वक नेहमीच या भारत देशाचा नागरिक म्हणून वापर कर.”
आज संविधान संवाद कोर्स चा 3 रा दिवस आहे पण खरंच मला माझ्या आयुष्याचं गमक समजलं आणि मी एक शिबिरार्थी म्हणून मला खरंच एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की,मी आज संविधान संवादक नाही पण माझं संविधान काय आहे आणि ते लोकांना समजावं यासाठी मला काय करता येईल,त्यासाठी मी नेहमी तत्पर राहीन.
आज देशामध्ये आलेल्या कोरोना महामारीमुळे प्रत्येकजण मृत्यूशी लढा देत आहे…निरोगी आहे तो पण आणि रुग्ण आहे तो पण.डॉक्टर त्यांचं काम करत आहेत ते कुठेच कमी नाहीत.पण आपले राजकीय पक्ष अजून ही एकमेकांच्या सोबत रहाण्याऐवजी खुर्ची मिळवण्याकरता भांडताना दिसत आहेत.वाईट ही वाटतं पण हसायला ही येतं कुठे तरी जेव्हा सोशल मीडिया वर प्रत्येकजण आपापल्या नेत्याकरता ठाम बाजू मांडत असतो.चुकीचा असला तरी माझाच लाल हे पटवून देत असतो.चुकीचं कोणी नाही…चूक माझी झाली मी माझ्या एका मताची किंमत ओळखत नव्हते अन्यथा आज माझे जवळचे ज्यांना मी गमावलं कधी ऑक्सिजन बेड मिळाला नाही म्हणून तर कधी इंजेक्शन उपलब्ध झालं नाही म्हणून….कधी हॉस्पिटल मध्ये स्फोट झाला म्हणून तर कधी ambulance वेळेत आली नाही म्हणून.मान्य आहे मला ह्या साऱ्या घटना हॉस्पिटल शी निगडित आहेत आणि तुम्हाला वाटेल याला डॉक्टर जबाबदार आहेत.पण खरंच आज या साऱ्या परिस्थितीला डॉक्टर जबाबदार असते तर आदर पूनावाला स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात आश्रित म्हणून राहायला गेले नसते….पहिली लाट येऊन गेली दुसरीशी आपण लढतोय तोवर 3 री दारात च बेल पाशी दाराच्या उभी आहे.
मला कोणत्याही पक्षा बद्दल वाईट प्रचार करण्याची इच्छा नाही.फक्त एकच विनंती आहे माझ्या देशातल्या माझ्या बांधवांना की,” जर खरंच तुम्हाला अशा अडचणींना भविष्यात सामोरे जायचे नसेल आणि स्वतःच्या प्रियजनांना गमवायच नसेल,तर आपल्या विवेक बुध्दीचा वापर करून योग्य माणसाला मतदान करा ज्याला तुम्ही प्रश्न विचारू शकता…जो तुमच्या मदतीसाठी तुमच्या दारी सदैव तत्पर असेल ना की फक्त रणधुमाळी समयी फक्त… तुमचं मत हे नेहमी दान न समजता खरंच जन्मसिद्ध हक्क समजा.. झोपलेल्याला जागं करता येत पण सोंग घेणाऱ्याला नाही ही अवस्था खरंच करून घेऊ नका…विचार करा एकदा दूध भाजलं आहे आता ताक ही फुंकून प्यायची वेळ आहे…माझ्या एकट्याच्या मतानी काय फरक पडणार जाऊदे म्हणून दुर्लक्ष नका करू…फरक पडत होता काल ही आज ही पडतोय आणि भविष्यात ही घडून आलेले बदल तुम्हाला स्वतःला पाहायला मिळतील.
खरंच मित्रांनो ही बोलण्याची वेळ नाही पण इथून पुढे आपण जगलो,वाचलो या महामारी मधून तर नक्कीच
“विचार करा आणि मगच मतदान करा.”
स्वतःचा अधिकार असा कवडी मोलाचा समजू नका…🙏🏼🙏🏼

Published by Amusing Soul.

Well written article is as like as Wrist Watch of my Dad, that's hookup you wear it again and again...💕 I am content writer and will help you to express your business in the market with unique ideas.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started